दाभोळ : दापोली तालुक्यातील टाळसुरे बौद्धवाडी येथील विद्यार्थ्यांचे अपहरण झाल्याची तक्रार दापोली पोलिसात दाखल केली आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबरला सकाळी ९.३० च्या सुमारास टाळसुरे बौद्धवाडी येथील यश रूपेश खैरे (वय १४) हा नववीत शिकणारा मुलगा टाळसूरे इंग्लिश स्कूलमध्ये जाण्यासाठी घरातून निघाला; मात्र तो शाळेत गेलाच नाही. त्याचा दिवसभर कोठेही थांगपत्ता लागला नाही. पालकांनी नातेवाइकांकडे व गावात शोधाशोध केली, मात्र तो आढळून आला नाही. अखेर सायंकाळी यश याच्या आईने दापोली पोलिसात अपहरण केल्याची तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक यादव करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:22 16-09-2023
