रत्नागिरी : गणेश आगमनाची भव्य दिव्य मिरवणूक काढून सर्वाचे लक्ष वधून घेणार्या कर्ला‚ आंबेशत गावांची गणेश आगमन मिरवणूक दि. १९ सप्टेंबरला वाजत गाजत निघणार आहे. तब्बल ३८ वर्ष सुरु असलेली परंपरा यावर्षीही जपली जाणार असून भव्य मिरवणूकीची जय्यत तयारी ग्रामस्थांनी सुरु केली आहे.
मंगळवारी चर्तुदर्शीच्या दिवशी सकाळी ९.३० वाजता स्वातंत्रवीर सावरकर पुतळ्याला पुष्पहार घालून मिरवणूक सुरु होणार असून ती दुपारी ३ वाजता कर्ला -आंबेशेत गावात पोहचणार आहे. या मिरवणुकीमध्ये सुमारे १०० ते १२५ लहान‚मोठ्या श्री गणेश बाप्पांचे आगमन होणार आहे. सुरुवातील ढोल‚ ताशे, झांझपथक, बागलकोटचे बंडपथक, शिवशक्ती मित्रमंडU आंबेशेत घोसाUेवाडी यांचे भजन मंडळ, कर्ला येथील गणराज महिला मंडळाचे लेझीम पथक तसेच संगम , नाचणे सुपलवाडी यांचे ढोलपथक अशा दिमाखदार जल्लोषी वातावरणात दिसणार आहे.
या मिरवणुकीचा पाया ३८ वर्षापूर्वी शाहीर के मधुकर (आप्पा) सुर्वे यांच्या शिस्तबद्ध नेतÉत्वाखाली रचला गेला. त्यानंतर सुर्वे सरांच्या निधनानंतर मिरवणूक समितीने नूतन अध्यक्ष महेंद्र सुर्वे आणि माजी जि.प. अध्यक्ष जयसिंगराव (आबा) घोसाळे यांच्या नेतÉत्वाखाली व कार्यकारी मंडळ समिती उपाध्यक्ष, सेक्रेटरी, सदस्य आणि दक्षता समिती सदस्य, सहकारी तरुण कार्यकर्ते, महिला भगिनी वर्ग ग्रामस्थ ही भव्यदिव्य लोकप्रिय व शिस्तबध्द मिरवणूक साकारत आहेत. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी या मिरवणुकीमध्ये नाविण्य आणले जाते. रत्नागिरीतील नागरिक, बाहेर गावचे चाकरमानी दुतर्फा गर्दी करून आपल्या सहकार्यांना, मुलांना ही मिरवणूक आवर्जुन बघायला आणतात.
खास म्हणजे एवढी मोठी मिरवणूक असूनसुध्दा अतिशय निटनेटके, शिस्तबध्द आयोजन या मिरवणूकीत जाणवून येते. कर्ला ‚आंबेशेत श्री गणेश आगमन (वैयक्तीक) मिरवणुकीचा मार्ग सालाबादप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळयापासून गोखले नाका, राम आळी, एस.टी. स्टँड, जिल्हा रुग्णालय, निवखोल घाटी, आदमपूर, राजीवडा, मारुती मंदिर , श्री साईमंदीर आंबेशेत (चौक) असा आगमन मिरवणुकीचा मार्ग असणार आहे. यावेळी येणारी लहान‚मोठी वाहने या मार्गाने सोडू नये, अशी विनंतीही श्री गणेश आमन (वैयक्तीक) मिरवणूकीच्या कार्यकारी मंडळाने केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:57 16-09-2023
