रत्नागिरी : कोकण रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना एसटी बस सेवेचा लाभ देण्याबाबतचे निवेदन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या रत्नागिरी शाखेतर्फे एसटी महामंडळ विभागीय व्यवस्थापक यांना देण्यात आले.
कोकण रेल्वेने मोठ्या प्रमाणावर प्रवासी कोकणात येत असतात. गणेशोत्सवा तर ही संख्या एक लाखापर्यंत पोहोचते. मात्र सर्वच रेल्वे स्थानके वाहतुकीच्या मुख्य मार्गापासून दूरवर आहेत. खेड चिपळूण आणि रत्नागिरी ही स्थानके एसटी वाहतुकीच्या मार्गावर असली तरी एसटीच्या गाड्या रेल्वे स्थानक मार्गे वळविल्या जात नाहीत. त्यामुळे मुंबईतून येणाऱ्या रेल्वेच्या प्रवाशांना डोक्यावरून बोजे वाहत मुख्य मार्गावरील बस यांच्यावर यावे लागते. मुंबईकडे जाताना मुख्य मार्गावरील बस थांब्यावरून त्याच पद्धतीने रेल्वे स्थानकाकडे जावे लागते.
यासाठी प्रामुख्याने खेड, चिपळूण आणि रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या जवळून जाणाऱ्या महामार्गावरील एसटीच्या सर्व बस गाड्या रेल्वे स्थानक मार्गाने याव्यात. सध्या तशी सोय नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. अनेकदा नाइलाजास्तव रिक्षाचे मनमानी भाडे देऊन त्यांना प्रवास करावा लागतो. एसटीने योग्य ती सेवा दिली तर त्यांचा त्रास वाचेलच, पण एसटीच्या उत्पन्नातही नक्कीच भर पडेल. याबाबत एसटीच्या अनेक प्रवाशांकडून ग्राहक पंचायतीकडे विचारणा झाल्याने त्यांच्या वतीने हे पत्र आपल्याला देत आहोत. येणाऱ्या गणेशोत्सवापासूनच एसटीने तशी व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 18-09-2023