रत्नागिरी शिवाजी स्टेडियम येथे रंगली शालेय कुस्ती स्पर्धा

0

रत्नागिरी : जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत रत्नागिरी जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा दिनांक 15 व 16 सप्टेंबर रोजी शिवाजी स्टेडियम रत्नागिरी येथे उत्साही वातावरणात पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण विलणकर यांच्या हस्ते झाले.

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे सलग 2 दिवस आयोजन करण्यात आले होते. शालेय खेळाडूंच्या डाव प्रतिडावांनी उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या स्पर्धेत फ्री स्टाईल मुले-मुली, ग्रिको रोमन या प्रकारात विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवले. दिनांक 16 रोजी मुलींच्या स्पर्धेचे उद्घाटन उषा नागवेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी श्रीकृष्ण विलणकर, सदानंद जोशी, जिल्हा क्रिडा कार्यालयाचे मांडवकर साहेब, आनंद तापेकर, फैयाज खतिब, वैभव चव्हाण, योगेश हरचेरकर, आनंदा सलगर, सुधीर गवंडे, स्वप्निल घडशी, अतुल गराटे, उषा नागवेकर, विद्या विलणकर, संदिप सुर्वे सामाजिक कार्यकर्ते, मानसिंग कदम, मारुती गलांडे आदी उपस्थित होते. विजेत्या मल्लांची निवड कोल्हापूर येथे होणार्‍या विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी करण्यात आली.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-

14 वर्षे मुले(विजयी) दशरथ डफडे, अक्षय डफडे, अथर्व गराटे, प्रतिक कांबळी, जाहिद लोखंडे, रूद्र आंबे्र, तन्मय शिनगारे, अब्बास मुसा, जिग्नेश रेमजे, ओवीस झोबडकर, 17 वर्षे मुले(विजयी) प्रथमेश पाटील, ऋतुराज कोत्रे, विघ्नेश शिंदे, यश जावळे, सलमान बगदादी, ओंकार पंडीत, मयुर मिटके, जयकुमार पाटील, दुर्वांक नागले, 19 वर्षे मुले(विजयी) वैभव जाधव, प्रकाश डफडे, बिरू झोरे, वरद ताम्हणकर, शेखर घोरपडे, नवाज शिवकर, अमान मुल्लाजी, संस्कार लटके.

14 वर्षे मुली (विजयी)- रीतिका निमरे, रिध्दी कोलते, हेमांगी कदम, संस्कृती आग्रे, वैदेही लोंढे, शमिका कदम, ईशा आलीम, मदिया हाजू, 17 वर्षे मुली (विजयी)-अनुष्का निंबरे, ईशा मांडवकर, तेजस्वी कदम, रचना काटकर, किर्ती सावंत, श्रुती शिवगण, हातिमा देशमुख, सारा पालकर, सेजल गोविलकर, 19 वर्षे मुली (विजयी)- नेहा दुधाळ, मंजिरी गोरिवले, श्रावणी सालेकर, चैताली शिंदे, मृणाल कांबळी, सानिया कांबळी, ग्रिको रोमन (विजयी)- अहद मुल्ला, ओम पवार, सुजल तळेकर.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 18-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here