लांजा : गणेशोत्सवानिमित्त मुंबई-गोवा हायवे वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लांजा शिवसेना संपर्क कार्यालयासमोर नामदार उदय सामंत, उद्योजक किरण भैय्या सामंत यांच्या सूचनेनुसार युवा सेनेच्या वतीने चहा नाश्ता वाटप केंद्र सुरू करण्यात आले.
मोफत चहा नाश्ता केंद्र सुरू करताना पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी भेट दिली. तसेच राजू कुरूप, तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, नगराध्यक्ष मनोहर बाईत, सचिन डोंगरकर, प्रसाद डोरले, बापू लांजेकर, दूर्वा भाईशेटे, मनोज तेंडुलकर, भाई कामत, संजय तेंडुलकर, गणेश लाखण यांनी भेट दिली.
मुंबई कडून कोकणात येणाऱ्या गाडी मधील ड्रायव्हर व प्रवाशांची विचारपूस करून त्यांना चहा नाश्त्याची सोय तालुका युवा अधिकारी राजू धावणे व शहर अधिकारी प्रसाद भाई शेटे यांच्यामार्फत केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 18-09-2023
