पुणे : राज्यात गेल्या २४ तासांत मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र सोमवारपासून तो कमी होत असून सर्वत्र हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय आहे. तसेच पूर्व राजस्थान व मध्य प्रदेशात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने तेथे अतिवृष्टी सुरू आहे. त्या भागातून महाराष्ट्रात पाऊस येण्यास थोडा वेळ लागणार आहे. त्यामुळे २० पर्यंत राज्यात कुठेही मोठ्या पावसाचा अंदाज नाही. कोकणात मध्यम, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 18-09-2023
