रत्नागिरी : तब्बल चार वेळा प्रचंड मताधिक्याने निवडून येणारे आमदार, विद्यमान पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या राजकीय वाटचालीचे नेहमीच कौतुक होत राहिले आहे. संवेदनशील, संयमी, सुसंस्कृत आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून आज संपूर्ण महराष्ट्रात त्यांची ओळख आहे. काल नामदार उदय सामंत रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात आमदार राजन साळवी यांच्या मतदार संघातील पुर्ये या गावात विविध विकासकामांचे भूमिपूजन होणार होते. या संपूर्ण कार्यक्रमाची जय्यत तयारी देखील करण्यात आली होती. ना. सामंत यांच्या हस्ते हे सर्व कार्यक्रम होणार होते. दरम्यान आ. राजन साळवी यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याची बातमी आली. हे वृत्त कानावर येताच ना. सामंतांनी हे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा एक मोठा निर्णय घेतला. राजकारणात पक्ष कोणताही असला तरी माणुसकी आणि संवेदनशीलता नेहमीच कशा पद्धतीने जपली पाहिजे हे आपल्या वर्तणुकीने ना. उदय सामंतांनी दाखवून दिले. तर याचवेळी एकीकडे खासदार विनायक राऊत यांच्या रत्नागिरी शहरातील नव्या कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या दणक्यात करण्यात आल्याने आता राजकीय वर्तुळात एक वेगळी चर्चा ऐकायला मिळत आहे.
