टाळसुरेतील हरवलेला मुलगा सापडला

0

दाभोळ : दापोली तालुक्यातील टाळसुरे- बौद्धवाडी येथून रुपेश खैरे (वय १४) या विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात त्याच्या आईने दाखल केली होती.

या संदर्भात पोलिस निरीक्षक विवेक आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक राजकुमार यादव, कॉन्स्टेबल सुहास पाटील, विरेंद्र सातर्डेकर यांनी तपास केला. हा मुलगा १६ सप्टेंबरला हरवलेल्या रूपेशला शोधून काढले असून त्याचे अपहरण झाले नसून तो स्वतहून घरातून निघून गेल्याचे केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. रूपेशला त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती दापोली पोलिसांनी दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 18-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here