महिलेच्या पर्समधून दागिन्याची चोरी; खेड बसस्थानकातील घटना

0

खेड : येथील बसस्थानकातून दुपारी सुटणाऱ्या खेड-शेरवली बसमध्ये बसलेल्या प्रवासी महिलेच्या पर्समधील एका डबीमध्ये ठेवलेल्या २ लाख ४० हजार रुपयांची दोन मंगळसूत्रे चोरट्याने चोरून नेली. हा प्रकार १५ सप्टेंबरला खेड बसस्थानकात घडली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, १५ सप्टेंबरला सकाळी फिर्यादी व त्यांची मुलगी खेड बसस्थानक येथून दुपारी गावी जाण्यासाठी खेड- शेरवली या बसमध्ये बसल्या होत्या. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या पर्समध्ये एका डबीत ठेवलेले दोन लाखांचे ४० ग्रॅमचे मंगळसूत्र आणि ८ ग्रॅमचे ४० हजारांचे सोन्याचे मणी मंगळसूत्र चोरट्याने चोरले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 18-09-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here