रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर खेड भोस्ते-विराचीवाडी रेल्वे फाटकानजीक रेल्वेतून पडून ओडिशाचा तरुणाचा मृत्यू झाला. उमाकांता माझी (वय २५, घासडुमर, ओडिशा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
तो कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाडीतून प्रवास करताना तोल जाऊन खाली पडला. त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर गस्त घालणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीस पडल्यानंतर पोलिसात खबर देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर मृतदेहाची तपासणी केली. त्यामध्ये तो तरुण मूळचा ओडिशामधील असल्याचे निष्पन्न झाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 18-09-2023
