‘महाराष्ट्राची हास्यजत्रा'(Maharashtrachi Hasyajatra) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या कार्यक्रमातील कलाकार विविध स्किट सादर करुन प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात.
आता गणेशोत्सवानिमित्त ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ च्या टीमनं प्रेक्षकांना खास गिफ्ट दिलं आहे. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सलग आठ दिवस प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमधून या कार्यक्रमाच्या एपिसोड्सची माहिती देण्यात आली आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसते की, शोमधील कलकार म्हणतात, ‘गणपती बाप्पा मोरया, वाजतगाजत होणार बाप्पाचे आगमन आणि सुरु होणार हास्याचा उत्सव कारण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ येणार 25 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर रोज रात्री नऊ वाजता.’ 25 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर यादरम्यान ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रोमोला कॅप्शन देण्यात आलं, गणेशोत्सवानिमित्त खास भेट….! तुमची लाडकी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सलग 8 दिवस! टीव्हीसमोर बसू या, सहकुटुंब हसू या!’
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:30 18-09-2023
