लांजा : चला जाणूया नदीला’ आणि ‘ मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमांतर्गत आंजणारी ग्रुप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात शनिवारी १६ सप्टेंबर रोजी वृक्षलागवड मोहिम राबविण्यात आली.
या अंतर्गत वृक्षदिंडी, स्वच्छतेची शपथ व प्रभात फेरी, स्वच्छता श्रमदान मोहिम असे उपक्रम राबविण्यात आले. चला जाणूया नदीला’ आणि ‘ मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमांतर्गत काजळी नदी पाणलोट क्षेत्रातील ग्रुप ग्रामपंचायत अंजणारी, शिरंबवली, नांदिवली गावांमध्ये वृक्षलागवड मोहिम राबविण्यात आली.
त्यासाठी लांजा वनविभागाचे वनपाल दिलीप आरेकर यांचे सहकार्य लाभले. सकाळी ९ वाजता आंजणारी शाळेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी, प्रभात फेरी काढली. त्यानंतर विद्यार्थी व ग्रामस्थांनी स्वच्छतेची शपथ घेतली.
यावेळी चला जाणूया नदी अभियानाचे प्रशासकिय सदस्य अनिल कांबळे, अशासकिय जिल्हा समिती सदस्य रोहन रमेश इंगळे, आंजणारी सरपंच प्रविण शिखरे, आंजणारी शाळेचे मुख्याध्यापक सुधिर रसाळ, शिक्षक महेंद्र शिंदे, बाबासाहेब माने, संदिप रसाळ, ग्रामसेवक समिर गमरे, अंगणवाडी सेविका श्रीमती. अंजली चव्हाण तसेच आंजणारी गातातील प्रकाश नरीम, सखाराम पेंढारी, दिपक पाष्टे, रविंद्र गावडे, संतोष गुरव आणि विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
या कार्यक्रमानंतर ग्रुप ग्रामपंचायत आंजणारी, शिरंबवली, नांदिवली परिसरात बहावा, हरडा, हेला, आवळा, जाभूळ, आपटा, मोहगणी आतंकी, बेल, लिंबू, शमी, काजू, रिंगी इत्यादी रोपे लावण्यात आली. आगामी काळात गावात वृक्षतोड बंदीबाबात ग्रामस्यांच्या सहकार्याने ठराव केला जाणार आहे. तसेच जैवविविधता उद्यानासाठी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने निर्मिती आणि मधाचे गाव म्हणून ओळख निर्माण होईल असा संकल्प या निमित्ताने करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:47 18-09-2023
