चिंताजनक : देशात २४ तासांत १५ हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह; बाधितांचा आकडा साडेचार लाखांवर

नवी दिल्ली : देशाभरात मागील २४ तासात आतापर्यंतचा सर्वात जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. एका दिवसात तब्बल ४६५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय देशात २४ तासात तब्बल १५९६८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत देशात एकूण ४,५६,१८३ कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. त्यापैकी १४,४७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत २,५८,६८५ जण बरेही झाले आहेत. सध्या १,८३,०२२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here