फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; नगरपालिका, मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू

0

महापालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या मंत्रिमंडळाने आज (ता. २३ ) घेतला. आजच्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. २ सप्टेंबरपासून नगरपालिका आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांना हा सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुका तोंडावर असताना देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज संस्थांमधील नगरपालिका आणि महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगाची मागणी जोर लावून धरली होती. त्या पार्श्वभूमीवर ऐन निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचे घोषित केले. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या महत्‍वपूर्ण निर्णयामुळे कर्मचार्‍यांच्‍या पगारात वाढ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here