ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये पत्रकारांचा प्रतिनिधी सभागृहात असला पाहिजे असे निवेदन देण्यात आले. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. घटनेतील कलम 171 (5)नुसार राज्यपालांच्या कोट्यातून साहित्य, विज्ञान, कला, पत्रकारिता, सामाजिक कार्य आदि क्षेतातील लोकांचीच नियुक्ती करावी असे स्पष्टपणे म्हटलेले आहे. राज्यपाल महोदयांनी नियुक्त्या करताना घटनेतील या तरतुदींचा आग्रह धरावा अशी विनंती देशमुख यांनी राज्यपालांना केली आहे. “पत्रकारांचा प्रतिनिधी विधान परिषदेत असावा” अशी विनंती किरण नाईक यांनी राज्यपाल महोदयांकडे केली. त्यासाठी पत्रकार, लेखक, सामाजिक कार्यकर्ते एस.एम.देशमुख यांना संधी मिळावी अशी विनंती त्यांनी राज्यपालांकडे केली. त्यावर राज्यपालांनी पत्रकारांचा प्रतिनिधी सभागृहात असला पाहिजे यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळात परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, मिडिया सेलचे राज्य निमंत्रक बापुसाहेब गोरे, स्वप्निल नाईक आदिंचा समावेश होता.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:06 PM 24-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here