कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्या बहिणी बुडाल्या; एकीचा मृत्यू

चिपळूण : तालुक्यातील निरबाडे येथील दगड खणीतील डबक्यात आईबरोबर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्या बहिणी बुधवारी दुपारी बुडाल्या. यात 9 वर्षीय बालिकेचा बुडून मृत्यू झाला. तर एकीला वाचवण्यात यश आले असून तिला चिपळुणातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निरबाडे मोहल्ला येथे राहणाऱ्या नजराना अहमद शेख (वय-9) आणि अरजीना अहमद शेख (वय-11) या दोघी आपल्या आईबरोबर दुपारी बारा वाजता जवळच्या दगडाच्या खणीमधील डबक्यात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. या वेळी नजराणा हिचा पाय घसरून ती पाण्यात पडल्यानंतर तिला वाचवण्यासाठी अरजीना धावली मात्र दोन्ही बुडू लागल्या नंतर आईने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यावेळी जवळचे ग्रामस्थ धावून आले आणि त्यांनी त्या दोघींना पाण्यातून बाहेर काढले त्यांना तात्काळ चिपळूण शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र दाखल करण्यापूर्वीच नजराना हिचा मृत्यू झाला. तर अरजीनावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:45 PM 24-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here