खेड भरणे महामार्गावर चार वाहनांचा भीषण अपघात; एक ठार

खेड : खेड भरणे महामार्गावरील आठवडे बाजारानजीक नियंत्रण सुटलेल्या कार चालकाने दोन दूचाकी आणि रुग्णवाहिकेला धडक दिल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात एका दूचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घड़लेल्या चार वाहनांच्या या विचित्र अपघातात वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान इाले आहे. वेर्ना कार (एमएच 06 बीएम 6555) वरील चालक सैफअली मोहजम परकार(रा. खेड) खेड भरणा नाका मार्गावर चालवित असताना चालकाचा कार वरील ताबा सुटल्याने पुढे असणारी दुचाकी (एमएच 08 एन 7278) ला जोराची ठोकर दिली. यानंतर रस्त्याच्या कडेला खेडच्या दिशेला उभी असलेली शासनाच्या आरोग्य विभागाच्या 108 रूग्णवाहिकेच्या डाव्या बाजूला जोराची ठोकर देत पल्सर दुचाकी (एमएच 08 एडी 3793) लाही जोराची ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात 5 जणाना गंभीर दुखापत झाली. यापैकी प्रकाश विक्रम चव्हाण (वय-50 रा. खेर्डी ता. चिपळूण) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. जखमींवर कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत. कार चालकावर भादंवि 304(अ), 279, 337, 338 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:09 AM 25-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here