रत्नागिरी : शहरातील टिळक आळी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने या वर्षी काराओके गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरीतील उभरत्या कारालाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी प्रवेश विनामुल्य आहे. रविवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले असून ३ सप्टेंबर रोजी रात्रौ ९.३० वाजता या स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. टिळक आळीती गणेशोत्सवानिमित्ताने मनोरंजनाचे अनेक कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतात. यानुसार या वर्षी या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे
‘कराओके गीत गायन स्पर्धा’ ( KARAOKE )
‘कलारंग, टिळक आळी निर्मित – सादरकर्ते टिळकआळी गणेशोत्सव मंडळ
रविवार दि. २५ ऑगस्ट २०१९
( प्राथमिक फेरी ) भगिनी मंडळ टिळक आळी, भिडे सेवा समोर, रत्नागिरी वेळ : सकाळी ११ वाजता
सदर स्पर्धेचे नियम पुढील प्रमाणे : १ ) ही स्पर्धा दोन गटांत विभागण्यात आली आहे गट – १ : वय वर्षे १२ ते १८ गट – २ : वय वर्षे १८ वरील २ ) स्पर्धेत सादर करण्यासाठी १ मराठी व २ हिंदी भाषेतील गाणी असावीत . ३ ) जे गाणे सादर करावयाचे आहे त्याचा ट्रॅक स्पर्धकाने आणावा . हा ट्रॅक पेन ड्राईव्ह किंवा मोबाईलमध्ये असावा, मोबाईल चार्ज करुनच आणावा. ४ ) स्पर्धकाने आणलेला ट्रॅक सादरीकरण करण्यापूर्वी तपासून घ्यावा. ५ ) दि. २५ ऑगस्ट ( रविवार ) रोजी प्राथमिक फेरीत निवड झालेले स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र असतील. ६ ) सादरीकरण करताना स्पर्धकांना साऊंड सिस्टीम वर कोणतेही साऊंड इंफेक्ट्स दिले जाणार नाहीत. ७ ) स्पर्धा प्रवेश विनामूल्य असून सर्वांसाठी खुली आहे. ८ ) स्पर्धकांना स्पर्धेच्या ठिकाणी १५ मिनिटे आधी उपस्थित रहावे व आपण आल्याची नोंद आयोजकांकडे करावी. त्यावेळी स्पर्धकांना कोड नंबर देण्यात येईल. हा कोड नंबर जाहीर झाल्यानंतर स्पर्धकांने आपले सादरीकरण करावे. ९ ) या स्पर्धेची अंतिम फेरी मंगळवार दि. ३ सप्टेंबर २०१९ रोजी रात्री ९ . ३० वा सुरु होईल. १० ) स्पर्धकांची अंतिम फेरी निवड आणि निकाल याबाबत अंतिम निर्णय परिक्षकांचा असेल.
विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे
आपण सर्वांनी या स्पर्धेत सहभागी होऊन ही स्पर्धा यशस्वी करावी ही नम्र विनंती . आपले नम्र, टिळक आळी गणेशोत्सव मंडळ, रत्नागिरी
कार्यक्रम माहितीसाठी व नांव नोंदणीसाठी संपर्क : सौ. छाया काळे : ९४०३३६१०१० सौ. दया भिडे : ९४२३८७७५९९ / ७०५७४४९९८९
नांव नोंदणी : दि . १५ ऑगस्ट २०१९ पासून सुरु
