महावितरणचे अव्वाच्या सव्वा बिल पाहून ग्राहकांना शॉक

रत्नागिरी : महावितरणचे अव्वाच्या सव्वा बिल पाहून ग्राहकांना चांगलाच शॉक बसला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून सलग तीन महिने रीडिंग न घेता सरासरी रीडिंगवर बिले काढली आहेत. तरी तीन महिन्याची अव्वाच्या सव्वा बिल आल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. अनेक ग्राहकांनी आपले गा-हाणे घेऊन महावितरणच्या कार्यालयावर गर्दी केली; मात्र बहुतांशी ग्राहकांना आमच्या हातात काही नाही, असे सांगून परत पाठविण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. महावितरण कंपनीने युनिटची शहानिशा करून योग्य ती वीज बिलाची आकारणी करावी, अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:33 PM 25-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here