पाली : तालुक्यातील पालीमध्ये जोरदार झालेल्या पावसामुळे ओढ्याच्या प्रवाहात मातीचा भराव टाकण्यात आलेला असल्याने पाण्याला अडथळा होऊन पाण्यात मोठी वाढ झाल्याने पाणी नागरी वस्तीमधील घरात घुसून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
वळके गावामधील शेतकर्यांचे ही नुकसान झाले आहे. महसूल विभागाकडून नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यात आले आहेत.
याबाबत पाली महसूल मंडळ कार्यालयातून देण्यात आलेली माहिती अशी की, परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे पाली बाजारपेठेतील ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह घरात घुसून स्थानिक रहिवासी अनंत गंगाराम पालकर, सुलोचना बाबासाहेब पाटील, आश्लेषा सुभाष मालुसरे या सर्वांचे घरातील वस्तूंचे व घराचे २ लाख ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाला पाली महसूल मंडळ अधिकारी, पाली तलाठी, पोलीस पाटील यांनी भेट देऊन पंचनामे केले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:03 03-10-2023
