खेड-तुळशी बसमुळे कळंबणी रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांची गैरसोय दूर

खेड : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर करण्यात आलेला लॉकडाऊन आता टप्प्या टप्प्याने शिथिल करण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने विविध सेवा सुरु केल्या जात असून एसटीच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. खेड आगाराने कशेडी मार्गावरही बस फेरी सुरु केल्या असल्याने महामार्गावरील कळंबणी येथे असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णांची फार मोठी गैरसोय दूर झाली आहे. खेड आगाराने प्रायोगिक तत्वावर चिपळूण, रत्नागिरी, दापोली-या मार्गावर एसटीच्या काही फेऱ्या सुरु केल्या. खेड तालुक्यातील बरीच गावे प्रतिबंधीत क्षेत्र असल्याने ग्रामीण भागात बसेस सोडता येत नव्हत्या. मात्र आता हळूहळू परिस्थिती बदलत चालली असून एसटी सेवा हळूहळू सुरळीत सुरू व्हायला लागली आहे. खेड मधील मदत ग्रुपने केलेल्या मागणीनुसार खेड आगाराने दोन दिवसांपासून खेड-तुळशी ही बस प्रायोगिक तत्वावर सुरु केली असल्याने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांची फार मोठी गैरसोय दूर झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:35 AM 26-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here