सरपंच, उपसरपंच मानधनासाठी १११ कोटी वितरित : हसन मुश्रीफ

राज्यातील ज्या सरपंच व उपसरपंचांनी मानधन अदा करण्याबाबतच्या संगणक प्रणालीवर अद्यापही नोंद केली नाही, त्यांनी या प्रणालीवर नोंद करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी स्पष्ट केले आहे. राज्य शासनाने ग्रामपंचायतीतील पात्र व कार्यरत सरपंच व उपसरपंच यांचे मानधन अदा करण्यासाठी १११ कोटी रुपये इतकी रक्कम वितरित केली आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या २७ हजार ६५८ आहे. यापैकी सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधन प्रक्रियेसाठी संगणक प्रणालीवर नोंदणी केलेल्या ग्रामपंचायतींची संख्या अनुक्रमे २५ हजार ६३९ आणि २५ हजार ४६७ आहे. अद्यापही दोन हजार १९ सरपंच आणि दोन हजार १९१ उपसरपंच यांची नोंदणी होणे बाकी आहे. अशांना मानधन मिळालेले नाही. तसेच मार्चपर्यंत नोंदणी झालेल्यांपैकी तीन हजार ८१४ सरपंचाचे व चार हजार २८७ उपसरपंचाचे मानधन अदा करणे प्रलंबित असल्याचे दिसून येते. सर्व कार्यरत व पात्र असलेल्या सरपंच व उपसरपंचांचे मानधन तसेच मार्चपर्यंत प्रलंबित सर्व देयके अदा करणेबाबत १ जुलैपर्यंत कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री मुश्रीफ यांनी सर्व जिल्हा परिषदांना दिल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:36 AM 26-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here