मार्गताम्हाने येथील सोसायटीत २ लाखांचा अपहार

चिपळूण : तालुक्यातील मार्गताम्हाने येथील विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादित या संस्थेमध्ये सुमारे दोन लाखांचा अपहार केल्याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अजित अनंत राऊत (रा. उभळे) असे आरोपीचे नाव आहे. या संदर्भात मारुती बाळाजी ठसाळे (६२, रा. कापसाळ) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजित राऊत यांनी या संस्थेमध्ये बोगस बँक भरणा व शिल्लक रक्कम कमी-जास्त लिहून सभासदांची कर्ज वसुली, भात बियाणे व खत विक्री, कीर्द जमा न करणे, सभासदांच्या कर्ज वसुलीची रक्कम कॅशबुकमध्ये जमा न करता आपल्याकडे ठेवून देणे असा १ लाख ९४ हजार ०६ रूपयांचा अपहार केला आहे. त्यानंतर ही रक्कम संस्थेकडे उशिरा जमा केली आहे. याबाबत सहकारी संस्था रत्नागिरी कार्यालयाकडील अहवालानुसार दि. २४ जून रोजी तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेने खळबळ उडाली असून, या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मणेर करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:55 AM 26-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here