फवारणी करताना औषध तोंडावर उडून शरीरात गेल्याने युवतीचा मृत्यू

लांजा : फवारणी हात पंपातून गवत मारण्याचे औषध तोंडावर उडाल्याने गंभीर झालेल्या १९ वर्षीय युवतीला अधिक उपचारासाठी कणकवली सिंधुदुर्ग येथे नेत असता वाटेत रुग्णवाहिकेमध्ये मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील गोळवशी धामणवाडी येथील पल्लवी जनार्दन खानविलकर (१९ वर्षे) ही शनिवार २० जून रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास तिच्या राहत्या घराजवळ गवत मारण्याचे औषध फवारणी हातपंपात भरून गवतावर फवारणी करण्यासाठी पंपाला हवा मारीत असताना तिच्या हातातून पंप सरकला. यावेळी पंपातील औषध तिच्या तोंडावर उडून नाका-तोंडाद्वारे पोटात गेले. त्यामुळे तिची प्रकृती बिघडल्याने तिला प्रथम लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर उपचारासाठी तिला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेले पाच दिवस याठिकाणी तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी पल्लवी हिला गुरुवार २५ जून रोजी पुढील उपचारासाठी कणकवली सिंधुदुर्ग येथे रुग्णवाहिकेतून हलविण्यात येत होते. मात्र रत्नागिरी-कणकवली प्रवासादरम्यान दुपारी १२ वाजता लांजा तालुक्यातील वाकेड घाटीत रुग्णवाहिका आली असता पल्लवी हिची प्राणज्योत मालवली. याबाबत तिचे वडील जनार्दन नारायण खानविलकर यांनी लांजा पोलीस ठाण्यात खबर दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यची नोंद करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:05 PM 26-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here