पुलवामा येथे तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

गुरुवारी रात्रीपासून सुरू असणाऱ्या चकमकीत जम्मू-कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात तीन दहशतवद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. सुरक्षा दलांनी संयुक्तरित्या ही कारवाई पार पाडली. जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे चेवा उल्लर परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार या घराला वेढा देण्यात आला. सुरक्षा दलांच्या वेढ्याची कुणकुण लागताच आत लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. हिंदुस्थानी सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. रात्री काही काळ अंधारामुळे ही मोहीम थांबवण्यात आली होती. सकाळी पुन्हा थोडी चकमक झाली. यात तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं. जून महिन्यात जम्मू कश्मीर येथे 15 चकमकी झडल्या असून त्यात 46 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तसंच, गेल्या वर्षभरात जवळपास 108 दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात दलांना यश आलं आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:59 PM 26-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here