मुंबई महानगरपालिकेला ५८ हजार कोटी उत्पन्न असतानाही मुंबई पाण्यात’

0

मुंबई : मुंबई महानगरपालिकेला ५८ हजार कोटी उत्पन्न फिक्स येत असतानाही प्रत्येक पावसाळ्यात शहर पाण्यात गेलेले असते, अशी बोचरी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. त्यांनी मनपाच्या कारभारावर चांगलेच ताशेरे ओढले. मुंबई मनपाने मनात आणल्यास  समुद्र किनाराही मॉरिशसमध्ये आहे, असा नितळ करतील असे गडकरी म्हणाले. देशांतर्गत भागात पहिले कांदळवन उद्यान मुंबईत तयार होणार आहे. या उद्यानाचे गोराई येथे भूमिपूजन गडकरींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री विनोद तावडे, खासदार गोपाळ शेट्टी तसेच भाजप पदाधिकारी उपस्थित होते.  गडकरी यांनी फिक्स ५८ हजार कोटी मुद्दा उपस्थित शिवसेनेला चांगलेच झोंबले असणार आहे. गडकरी पुढे म्हणाले, मुंबईमद्ये इटलीच्या धर्तीवर वॉटर टॅक्सी सेवा सुरु केली पाहिजे. मी स्वतःला एक मुंबईकर समजतो. विदर्भातील पाच जिल्हे लवकरच डिझेलमुक्त होतील. येत्या काळात बायो सीएनजीचा वापर वाढवणार आहे. गडकरी यांनी  नवीन प्रदूषण नियंत्रण योजनेमुळे राजधानी दिल्लीमधील प्रदूषण २६ टक्क्यांनी खाली आल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here