पाकिस्तानमध्येही इंधनाच्या दरात कमालीची वाढ

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने आधीच महागाईमध्ये पिचलेल्या जनतेला मोठा शॉक दिला आहे. एकाच दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एवढ्या वाढविल्या आहेत की दरांनी शंभरी गाठली आहे. पाकिस्तानमध्ये भारतापेक्षा इंधनाचे दर कमी होते. तर आता पाकिस्तानमध्ये पेट्रोलच्या किंमतीमध्ये थेट 25.58 पाकिस्तानी रुपयांची वाढ केली आहे. यामुळे पाकिस्तानात आता पेट्रोलची किंमत 100.10 रुपये प्रतिलीटर झाली आहे. तर डिझेलच्या किंमतीत 21 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे डिझेल 101.46 रुपयांना विकले जाणार आहे. पाकिस्तानात पेट्रोलपेक्षा डिझेलची किंमत जास्त झाली आहे. तर रॉकेलचीही किंमत 24 रुपये प्रतिलीटरने वाढविण्यात आली आहे. नवीन दर जाहीर करताच अनेक शहरांतील पेट्रोल पंप बंद करण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या जिओ न्यूजनुसार जादातर पेट्रोलपंपांवर तांत्रिक समस्या असल्याचे बोर्ड लटकविण्यात आले आहेत. तर काही पेट्रोलपंपांवर कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. इंधनाच्या दरात कमालीची वाढ केल्यामुळे विरोधी पक्षानेही टीकेचे आसूड ओढण्यास सुरुवात केली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

इम्रान खान यांच्या इंधन दरात मोठी वाढ करण्याच्या विरोधामध्ये विरोधी पक्ष उतरले आहेत. पाकिस्तान पिपल्स पार्टी(पीपीपी)चे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी हा कसला निर्णय आहे असा सवाल केला आहे. सरकारच्या अपयशामुळे पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. याचा अर्थ असा नाहीय की पंतप्रधान इम्रान खान यांनी तिजोरी भरण्यासाठी गरिबांना लुटावे. निवडून दिलेल्या पंतप्रधानांनी मनमानी करू नये. तर नवाझ शरीफ यांच्या पक्षाचे खासदार आसिफ किरमानी यांनी सांगितले की, हे पेट्रोल बॉम्ब आहे. जगातील इतर देश गरीबी दूर करण्याची पाऊले उचलत आहेत. तर पाकिस्तानी सरकार गरिबांनाच संपवायला उताविळ झाले आहे. भारताच्या एका रुपयाची किंमत पाकिस्तानच्या 2.22 रुपयांएवढी आहे. याचा अर्थ भारतीय मुल्यांमध्ये पाकिस्तानी मुल्याच्या तुलनेत दुपटीहून जास्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here