कोकण विभागात बऱ्याच ठिकाणी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्याने शनिवार दिनांक 17 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 18 ऑगस्ट या दोन्ही दिवशी जिल्ह्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच तहसीलदार कार्यालयांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही दिवशी महसूल विभागातील सर्व कार्यालये चालू राहणार आहेत.
कोकण विभागात नैसर्गिक आपत्ती उद्भवल्याने काम चालू ठेवून नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई वाटप करावे अशा सूचना विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. शनिवार दिनांक 17 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 18 ऑगस्ट या दोन्ही दिवशीच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
राज्यातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना तसे पत्र विभागीय आयुक्त कार्यालयातून प्राप्त झाले आहे.
