खा. सुप्रिया सुळेंकडून रायगड जिल्ह्यातील शाळांना पत्रे आणि इतर साहित्याचे वाटप

रायगड : चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील शाळांना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज भेट दिली आणि आपदग्रस्त शाळांच्या व्यवस्थापनाकडे पत्रे व इतर पूरक साहित्य सुपूर्द केले. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने आपदग्रस्त शाळांना पत्रे व इतर पूरक साहित्य वाटप करण्यासाठी आज वेल्फेअर ट्रस्टच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे या मुरुड-नांदगाव येथे आल्या होत्या. खा. सुप्रियाताई सुळे यांच्या या एकदिवसीय दौऱ्यात त्यांच्यासमवेत खासदार डॉ. अमोल कोल्हे, राज्याच्या विधी व न्याय राज्यमंत्री आणि रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे व पदाधिकारी उपस्थित होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:50 PM 27-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here