रत्नागिरी जिल्ह्यात १ ते ८ जुलै पर्यंत लॉकडाऊन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता १ ते ८ जुलै पर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येत आहे अशी घोषणा तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केली.
रत्नागिरी जिल्ह्यात ११७ कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे, याचा प्रसार आता ग्रामीण भागापर्यंत होवू नये या दृष्टीने आमची राज्याच्या मुख्य सचीवांशी चर्चा झाली तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब तसेच जिल्ह्याधिकारी यांचे एकत्रित ही व्हिसी झाली आहे. केवळ अत्याश्यक सेवा वगळता या ब्रेक द चेन या पॅटर्न राबविला जाईल असे उदय सामंत यांनी सांगीतले. यावेळी नाईट कर्फू ची अमलबजावणी अतिशय कडक होईल असेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्ह्याथिकारी मिश्रा यांनीही माहिती दिली. जिल्ह्यात प्लाझामा थेरपी सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here