69th National Film Awards: दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारताना वहीदा रेहमान भावूक..

0

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान (Waheeda Rehman)यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ( National Film Awards) दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke Award) जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते वहीदा रेहमान यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी वहीदा रेहमान या भावूक झाल्या.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर वहीदा रेहमान म्हणाल्या, “मी सर्वांचे आभार मानते. आज मी इथे उभी आहे याचं सर्व श्रेय माझ्या फिल्म इंडस्ट्रीला जाते. मेकअप आर्टिस्ट, हेअर आणि कॉस्टुम डिपार्टमेंटचे देखील काम खूप महत्वाचे असते. हा पुरस्कार मी फिल्म इंडस्ट्रीमधील सर्व डिपार्टमेंट्ससोबत शेअर करु इच्छिते. त्या सर्वांनी मला खूप प्रेम दिले आणि सपोर्ट केला.”

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:07 17-10-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here