विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर

चिपळूण : राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वीच दरेकर यांनी निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण दौरा केला होता. सोमवार दि. २९ जून रोजी सकाळी ९:०० वा. त्यांच्या हस्ते रत्नागिरीतील भाजप पक्ष कार्यालयाचे उद्घाटन, यावेळी ते कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून जिल्ह्यात पक्षवाढीसंदर्भात मार्गदर्शन केल्यावर ते दापोलीकडे प्रयाण करतील. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व अन्य शासकीय अधिकारी उपस्थित राहाणार आहेत. दापोली येथे दुपारी १२ वा. शासकीय विश्रामगृहात दरेकर हे जिल्ह्यातील कोरोनानियंत्रणाबाबत प्रशासन राबवित असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतील. यानंतर दरेकर हे दुपारी २:३० वा. महाडकडे रवाना होतील.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:12 AM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here