कोकणातील पहिल्या फॉरेन्सिक लॅबचे आज रत्नागिरीत उद्घाटन

0

रत्नागिरी– येथे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीच्या पहिल्याच ‘लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रगोशाळा’ (फाॅरेन्सीक लॅब) चे उद्घाटन झाले. हे उद्घाटन पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या प्रयोगशाळेच्या उद्घाटनप्रसंगी खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, न्यायिक व तांत्रिक महासंचालक हेमंत नगराळे, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे, न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचे संचालक डॉ. कृ.वि.कुलकर्णी आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

HTML tutorial

अलिकडच्या काळात गुन्हेगार गुन्हे करताना अत्याधुनिक सामुग्री व पद्धतीचा वापर करत आहेत. त्या प्रवृत्तींना विफल करण्यासाठी दाखल झालेल्या मुद्देमालावर रासायनिक विश्‍लेषण केले जाते. सामाजिक दृष्टीकोनातून तपास यंत्रणांना आणि पर्यायाने न्यायदान यंत्रणेला महत्वाचा वैज्ञानिक पुरावा वेळेवर उपलब्ध करुन देण्यासाठी, असे फाॅरेन्सीक लॅब महत्वाची भूमिका बजावतात. वैज्ञानिक प्रयोगशाळेत समाजात घडणार्‍या निरनिराळ्या गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमालावर शास्त्रीय पद्धतीने विश्‍लेषणाचे कार्य केले जाते.


सद्यस्थितीत मुंबई येथे मुख्य प्रयोगशाळा आहे. तर त्याचबरोबर नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर येथे अशा ७ प्रयोगशाळा कार्यारत आहे. २४ जानेवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार ठाणे, रत्नागिरी, चंद्रपूर, सोलापूर आणि धुळे या ५ लघु प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार चंद्रपूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठीची प्रयोगशाळा सुरू झाली. या अगोदर या जिल्ह्यातील गुन्ह्यातील मुद्देमाल पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येत होता. ही प्रयोगशाळा सुरू होताच विषशास्त्र व जिवशास्त्र विभागाच्या मुद्देमालाची तपासणी या ठिकाणी करणे शक्य होणार आहे.

या प्रयोगशाळेसाठी नाममात्र दरात आपली जागा उपलब्ध करून देणारे पुष्पेंद्र सिटीचे निर्माते महेंद्रशेठ जैन आणि विकिशेठ जैन यांचा देखील या उद्घाटन प्रसंगी सत्कार करण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here