संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी यांचेवतीने वादळग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

रत्नागिरी : निसर्गवादळाने दापोली तालुक्यातील जगजीवन विस्कळीत झाले शिवाय तालुक्यातील डोंगराळ भागात लोकांना दैनंदिन आहारामध्ये वापरले जाणारे वस्तू सुद्धा शिल्लक नव्हते. संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी यांच्या ही गंभीर बाब निदर्शनास आल्याने किती कुटुंबिय यापासून वंचित आहेत याची पाहणी केली आणि रविवारी दापोली येथील पाळंदे, हर्णे बौध्दवाडी, पाजपंढरी येथील दुर्गम भागात जावून 100 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्या भागातील लोकांकडे आजपर्यंत कोणतीच मदत न मिळाल्याचे त्यांनी सांगितले. गेले 22/23 दिवस लाईट ही नव्हता अशा वेळी त्यांची उपासमार थांबविण्याचे काम संकल्प युनिक फाउंडेशन यांनी केले. जीवनावश्यक वस्तूंचे संकलन करण्यासाठी एनजीओ संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी यांचे सर्व सभासदांनी खूप मेहनत घेतली. दापोली दौऱ्यात एनजीओचे अध्यक्ष दिलावर कोंडकरी, उपाध्यक्ष शकील गवाणकर, खजिनदार सयीद मुल्ला, रुग्ण मदत केंद्र प्रमुख ईस्माइल नाकाडे यांनी सहभाग घेतला. या दौ-याचे वेळी पत्रकार मुश्ताक खान यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते येथील एनजीओच्या शाखेतून ही मदतीचा हात मिळाला. मजीद नेवरेकर, कॅप्टन हनीफ खलफे, तैमिना वणू, इरम नेवरेकर, रफीक नेवरेकर आदींनी सहकार्य केले. याहीपुढेही आपण अशाचप्रकारे सामाजिक कार्य सर्वांचे सहकार्य घेवून करु, असे एनजीओ रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष दिलावर कोंडकरी यांनी सांगितले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:15 AM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here