इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेसचे आज राज्यव्यापी आंदोलन

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती निच्चांकी पातळीवर असताना देखील मोदी सरकार त्याचा थेट लाभ सामान्य जनतेला होऊ देत नाही. उलट सलग 19 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढच केली जात आहे. करोनामुळे जगणे कठीण झाले असताना ही भाववाढ सामान्य जनतेवर अन्याय करणारी आहे. याच पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात मोदी सरकार विरोधात सोमवारी कॉंग्रेसने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या विरोधात 29 जूनला सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी 10 ते 12 या वेळत दोन तास धरणे आंदोलन करत इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात येणार आहे. हे आंदोलन नियम पाळून करण्यात येईल. याच दिवशी ऑनलाइन मोहीम सोशल मीडियावरही राबविली जाणार आहे. त्यानंतर या मोहिमेचा दुसरा टप्पा 30 जून ते 4 जुलै या सप्ताहात ब्लॉक व तालुका स्तरावर धरणे आंदोलन करून केला जाणार आहे. या आंदोलनासाठी विभागनिहाय समन्वयक नियुक्‍त करण्यात आले आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:32 AM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here