शेतकऱ्यांना नुकसान भरपाई; बोगस बियाणांप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल होणार : मुख्यमंत्री

मुंबई : लॉकडाउनच्या काळात आधीच शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असताना आता नव्या हंगामात बोगस बियाणं विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल होऊन शिक्षा होईल. तसेच ज्यांनी हे नुकसान केले त्यांच्याकडून नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांना मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही काळजी करु नका हे सरकार तुमचं आहे. ज्याने ज्याने तुम्हाला फसवलेलं आहे ते कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत. त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करुन सजा तर होईलच पण तुमचं जे जे नुकसान झाले आहे, ज्यांनी ते केलं आहे त्यांच्याकडून हे सरकार तुम्हाला नुकसान भरपाई सुद्धा मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:01 AM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here