रत्नागिरी : लॉकडाऊन काळात महावितरणकडून आकारण्यात येणाऱ्या भरमसाठ बिलाच्या अनुषंगाने ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आमदार राजन साळवी यांनी महावितरण कार्यालय, पॉवर हाऊस, रत्नागिरी येथे सोमवार २९ जून रोजी दुपारी २ वाजता बैठक आयोजित केलेली आहे. तरी महावितरणच्या बिलांबाबत कोणाच्या तक्रारी असतील तर त्यांनी दुपारी २ वाजता महावितरण कार्यालय, पॉवर हाऊस येथे उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार राजन साळवी यांनी केले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:10 AM 29-Jun-20
