अखेर सलून दुकाने झाली सुरु

रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही अटी शर्थीवर राज्यातील सलून उघडण्याची परवानगी राज्य सरकारने दिली होती. त्यानुसार योग्य ती खबरदारी घेत लॉकडाऊनमुळे बंद असलेली रत्नागिरीतील सलून दुकाने अखेर तीन महिन्यानंतर सुरू झाली आहेत. सलून सुरू झाल्याने रविवारी रत्नागिरीतल्या अनेक सलून दुकानांच्या बाहेर ग्राहकांची गर्दी पहायला मिळत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेवून सलून सुरु झाली आहेत. केस कापणाऱ्या कामगारांना सुरक्षेची योग्य ती साधने देऊन रत्नागिरीत रविवार पासून केस कापण्यास सुरुवात झाली. ग्राहकालाही मास्क अनिवार्य करण्यात आलं आहे. तसेच आलेल्या ग्राहकांची नोंद करण्यात येत आहे. सॅनिटाईझरचा वापर करण्यात येत वस्तूंचं निर्जंतुकीकरणही करण्यात येत आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:28 AM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here