गणपतीपुळे समुद्रात तीन पर्यटन बुडाले, दोघांचे मृतदेह सापडले एकजण अद्याप बेपत्ता

0

पर्यटनासाठी आलेले कोल्हापूरचे तिघेजण बुडाल्याची घटना आज पहाटे गणपतीपुळे येथील समुद्रात घडली. त्यातील दोन महिलांचे मृतदेह सापडले असून एक पुरुष बेपत्ता आहे. बेपत्ता पुरुषाचा शोध घेण्यात येत आहे. कोल्हापुरातून आलेले हे तिन्ही पर्यटक शहरातील कसबा बावडा येथील आहेत. काजल जयसिंग मचले (१८), सुमन विशाल मचले (२३) आणि राहुल अशोक बागडे (२७) अशी त्यांची नावे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here