शीळ-सौंदळ रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागणार

राजापूर : राजापूर तालुक्यात अर्जुना नदीच्या पुराच्या वाढणाऱ्या पाण्याखाली शीळ-गोठणेदोनिवडे-चिखलगाव-सौंदळ रस्ता सातत्याने राहिल्याने पावसाळ्यात या पंचक्रोशीतील गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटतो. त्यामुळे या रस्त्याची उंची वाढवावी, आवश्यक तेथे रस्ता रूंदीकरण करावे, त्यासाठी लागणारा आराखडा तातडीने तयार करावा, असे निर्देश राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. त्याप्रमाणे लवकरच आराखडा तयार करण्याचे आश्वासन बांधकाम विभागाचे उपअभियंता टी. वाय. कदम यांनी दिले. पंचक्रोशी ग्रामविकास समितीने निवेदनाद्वारे या रस्त्याच्या समस्येकडे आ. साळवी यांचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेऊन आ. साळवी यांनी पाहणी केली. गोठणेदोनिवडे पंचक्रोशीतील गावांना जोडण्यासाठी शीळ ते सौंदळ हा महत्त्वाचा रस्ता असून तो पुढे कोल्हापूर भागाला जोडला जात असल्याने घाटमाथ्यावरून येण्यासह जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. मात्र, दरवर्षी पावसाळ्यात अर्जुना नदीला पूर आल्यानंतर हा रस्ता पुराच्या पाण्याखाली जातो. त्यामुळे पंचक्रोशीतील गावांचा संपर्क अनेकवेळा तुटतो आणि पलीकडच्या ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते. त्याबाबतचे निवेदन पंचक्रोशी ग्रामविकास समितीतर्फे आ. साळवी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागालाही देण्यात आले होते. आ. साळवी यांनी तात्काळ दखल घेतली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:53 PM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here