चिपळूणात १ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

चिपळूण : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांना रक्ताची कमतरता भासू नये म्हणून चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आ. शेखर निकम यांच्या पुढाकाराने चिपळूण तालुक्यातील सह्याद्री शिक्षण संस्था सती हायस्कूल येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर १ जुलै रोजी सकाळी १० ते २ यावेळेत होणार आहे. सोशल डिस्टन्सिंग व नियमांचे पालन करण्याकरिता रक्तदात्यांनी आधीच नोंदणी करणे आवश्यक आहे. या शिबिराकरिता रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाची रक्तपेढी यांचे सहकार्य लाभणार आहे. इच्छुक रक्तदात्यांनी आपली नावे नोंदवून रक्तदान करावे, सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार शेखर निकम यांनी केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
1:42 PM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here