खेडमधील नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याची मागणी

खेड : लॉकडाऊन काळातील नगर परिषद हद्दीतील नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करा, अशी मागणी शहर शिवसेनेने मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. लॉकडाऊनमुळे छोटे व्यावसायिक नोकरदार वर्गाला आर्थिक झळ बसली आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषद हद्दीतील घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख निकेतन पाटणे, गटनेते बाळा खेडेकर, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, नगरसेवक, प्रज्योत तोडकरी, फारूख मणियार, नगरसेविका सीमा वंडकर, मनिषा निर्मळ, सुरभी धामणस्कर, विभागप्रमुख नईम मुजावर, सुनील धामणस्कर, पिंट्या जोशी, दिल्लीप सावंत, मनोहर चव्हाण आदी उपस्थित होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:02 PM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here