कोरोना पार्श्वभूमीवर रघुवीर घाट पर्यटकांसाठी बंद

खेड : खेड तालुक्यातील रघुवीर घाट हा रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणारा दुवा आहे. पावसाळ्यात या घाटातून दिसणारा निसर्गाचा नजराणा डोळ्याचे पारणे फेडणारा असल्याने पावसाळा सुरु झाला की या घाटात पर्यटकांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी होते. परंतु सध्या दिवसेंदिवस वाढणारा कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांचे खास आकर्षण असणारा खेड तालुक्यातील रघुवीर घाट पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. तालुक्यातील खोपी गावच्या हद्दीतून घाटात जाणारा रस्ताच बंद करण्यात आला आहे. त्यामुळे घाटात जाण्याची इच्छा असलेल्या पर्यटकांना घाटात जाणेच शक्य होणार नाही.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
1:59 PM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here