लॉटरीच्या आमिषाने तरुणाची १ लाख ३३ हजाराची फसवणूक

खेड : बारा लाख रुपयांच्या लॉटरीचे आमिष दाखवून खेड येथील एक तरुणाला १ लाख ३३ हजाराचा गंडा घालण्यात आला. त्याबाबतची तक्रार खेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीत काम करणाऱ्या संदीप कुमार दास या तरुणाला अज्ञात व्यक्तींनी खरेदी केलेल्या ब्ल्यू टुथ डिव्हाइसवर १२ लाख २५ हजार रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगितले. रजिस्ट्रेशन फी, जीएसटी, आरबीआय टॅक्स भरावे लागणार असल्याचे सांगून त्याच्याकडून गुगल पेद्वारे एक लाख ३३ हजार ९५० रुपये उकलळे. दास यांच्याकडून त्याने ही रक्कम गुगल पे अॅपद्वारे वेगवेगळ्या खात्यात भरून घेतली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर दास यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:51 PM 29-Jun-20