वांद्रीत सॅनिटायझर कक्षाची उभारणी

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथे कोरोनाच्या वाढत्या प्रसारापासून गावातील लोकांची सुरक्षितता जपण्यासाठी आणि गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी सॅनिटायझर कक्षाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. वांद्री गावचे सुपुत्र व विशेष कार्यकारी अधिकारी अरुण नागवेकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सॅनिटायझर कक्षाचे गावातील ज्येष्ठ व्यक्तीमत्व आणि मुंबईचे उद्योगपती भाऊकाका रानभरे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून तो थांबावा व गावातील लोकांना कोरोना व्हायरसचा त्रास होऊ नये, यासाठी चक्क वांद्री बस स्टॉपवरच सॅनिटायझर कक्षाची उभारणी करून गावातील ग्रामस्थांना मदतीचा हात देण्यात आला आहे. या उपक्रमाची पंचक्रोशीतून प्रशंसा होत आहे. या लोकोपयोगी उपक्रमात युवा कार्यकर्ते संदीप सालीम व अमोल कदम यांचे विशेष सहकार्य लाभले. सॅनिटायझर कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच अनिशा नागवेकर, उपसरपंच मांजरेकर, ग्रा.पं.सदस्य, गावातील ज्येष्ठ व्यक्ती, ग्रामकृती दल सदस्य उपस्थित होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
3:34 PM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here