प्रशासनाच्या निर्णयाचे परिणाम स्थानिकांना भोगायला लागतात : निशिकांत भोजने

रत्नागिरी : कोरोनाच्या बाबतीत प्रशासनाच्या घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम सामान्य नागरिकांना भोगायला लागत आहेत. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर आताच सामान्य नागरिकांची रोजीरोटी सुरू झाली होती त्यावर पुन्हा लॉकडाउन करून कुऱ्हाड मारण्याचा प्रयत्न योग्य नाही, अशी टीका चिपळूणचे उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांनी केली आहे. ऑपरेशन ब्रेक द चेन म्हणत येत्या १ जुलैपासून जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाउन सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यावर भोजने यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जिल्ह्यात चाकरमानी आल्यानंतर आता कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यानंतर परस्पर लॉकडाउनचा निर्णय कसा काय घेतला जातो, असा प्रश्न भोजने यांनी उपस्थित केला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:17 PM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here