परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा फी परत द्या : आशिष शेलार

मुंबई : एकीकडे सरकारने परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली असली तरी मुंबई विद्यापीठाने मात्र विद्यार्थ्यांकडून परिक्षा फी वसूली सुरू ठेवली असून ती तात्काळ थांबवा. उलट परीक्षा रद्द झाल्या मग विद्यार्थ्यांना परीक्षा फी परत द्या, अशी मागणी भाजपा नेते माजी शिक्षणमंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी आज कुलपती म्हणून राज्यपाल भगतसिंह कोशारी आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्राद्वारे केली आहे. मुंबई विद्यापीठाने सर्व कॉलेजना याबाबतचे आदेश निर्गमित केले असून कॉलेजने जमा केलेली फी विद्यापीठाकडे जमा करावी असे निर्देश दिले आहेत. ही बाब अन्यायकारक असल्याचे उघड करत आ. अँड आशिष शेलार यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहिले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:53 PM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here