भाजपा व्हर्चुअल सभेला दणदणीत प्रतिसाद; १० हजाराच्या घरात नागरिक सहभागी

रत्नागिरी : दि. २८ जून २०२० रोजी भाजपा विभागाच्या व्हर्चुअल सभेला स्मृती इराणी यांनी संबोधित केले. नविन डिजिटल माध्यमांचा उपयोग करत मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील प्रथम वर्ष परिपूर्ती या पार्श्वभूमीवर ही सभा आयोजित करण्यात आली होती. स्मृती इराणी, देवेंद्रजी फडणवीस यांनी या सभेला संबोधित केले. फेसबुक लाईव्ह, वेबेक्स अॅप, युट्युब यांच्या माध्यामातून ह्या सभेशी जनता जोडली गेली होती. रत्नागिरी मध्येही या सभेला भरभरून प्रतिसाद प्राप्त झाला होता. आ.प्रसादजी लाड यांनी कोकणातील सभेचे आयोजनाचे संयोजक म्हणून काम पाहत कोकणातील संपूर्ण संघटनेला कार्यप्रणव करीत प्रचारात आघाडी घेत सभा यशस्वी केली. डिजिटल माध्यमांना आज पर्याय नाही हे ओळखत भाजपाने कार्यकर्त्यांकडून मोबाईल नंबर उपलब्ध करून घेवून कार्यक्रमांची लिंक प्रत्येक मोबाईल धारकाला पाठवली आणि मोठा प्रतिसाद प्राप्त करत पहिली सभा यशस्वी केली. रत्नागिरी मध्ये सुमारे १० हजाराच्या घरात लोकांनी सभेमध्ये सहभाग घेतला अशी माहिती रत्नागिरी दक्षिण भाजपा अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:26 PM 29-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here