कामथे रुग्णालयातील सुसज्ज तीन वॉर्डचे आज लोकार्पण

चिपळूण : कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात चिपळूण तालुका मुस्लिम समाज संस्थेने अद्ययावत केलेल्या तीन वॉर्डचे लोकार्पण आज (दि. ३० जून) होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करोनाग्रस्तांसाठी आणि भविष्यात कामथे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या सोयीसाठी प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार चिपळूण तालुका मुस्लिम समाज या संस्थेने कामथे उपजिल्हा रुग्णालयातील तीन वॉर्ड सुसज्ज केले आहेत. या तीन वॉर्डचा लोकार्पण सोहळा मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन चिपळूण तालुका मुस्लिम समाजाचे सहसचिव नाजीम अफवारे यांनी केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:03 AM 30-Jun-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here