कोजागिरी पौर्णिमेवर यंदा चंद्र ग्रहणाचं सावट

0

धार्मिकदृष्ट्या चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2023) अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. 2023 सालातील शेवटचं चंद्रग्रहण (Lunar Eclipse) लवकरच होणार आहे. चंद्रग्रहणाचा लोकांच्या जीवनावर चांगला आणि वाईट असा दोन्ही पद्धतीने परिणाम होतो.

यंदाच्या वर्षीचं शेवटचं 28 ऑक्टोबरला, म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या (Kojagiri) दिवशी होत आहे.

शरद पौर्णिमेला चंद्रग्रहणाचा योग अवघ्या 30 वर्षांनंतर आल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. चंद्रग्रहणादरम्यान काही गोष्टी करणं टाळलं पाहिजे, याबद्दल जाणून घेण्याआधी प्रथम चंद्रग्रहणची वेळ जाणून घेऊया.

नेमकं कधी सुरू होणार चंद्रग्रहण?

शनिवारी, म्हणजेच 28 ऑक्टोबरला मध्यरात्री 01:06 वाजता चंद्रग्रहण सुरू होईल आणि 29 ऑक्टोबरला मध्यरात्री 02:22 वाजता समाप्त होईल. 2023 मधील शेवटचं चंद्रग्रहण अश्विन महिन्याच्या शरद पौर्णिमेच्या दिवशी होईल.

चंद्रग्रहणादरम्यानचा सुतक कालावधी

चंद्रग्रहणादरम्यान 28 ऑक्टोबरला दुपारी 3:15 च्या सुमारास सुतक सुरू होईल आणि ग्रहण संपेपर्यंत ते चालू राहील. सुतक काळापासून चंद्रग्रहण होईपर्यंत कोणतंही शुभ कार्य करू नये, असं म्हटलं जातं. ग्रहण काळात नकारात्मक शक्तींचं वर्चस्व सुरू होतं, अशी मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहण ही अशुभ घटना मानली जाते.

पंचागानुसार हे ग्रहण 28 आणि 29 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी होईल. हे ग्रहण भारतात पाहता येणार आहे. 2023 मधील हे दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण असेल. हे चंद्रग्रहण आंशिक ग्रहण आहे.

चंद्रग्रहणादरम्यान या गोष्टींची घ्या विशेष काळजी

  • गरोदर महिलांनी घराबाहेर पडू नये, असं सांगितलं जातं. कारण ग्रहणाचा गर्भातील मुलावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
  • या काळात गर्भवती महिलांनी चंद्रग्रहण पाहू नये आणि घराबाहेर पडू नये.
  • चंद्रग्रहणाच्या वेळी देवाचं ध्यान करा आणि मंत्रांचा जप करा. पण मंदिरात जाऊ नका.
  • चंद्रग्रहणादरम्यान शिळं अन्न खाणं टाळावं.
  • चंद्रग्रहण काळात तुळशीची पानं शिजवलेल्या अन्नात, दूध आणि दही यांसारख्या पदार्थांमध्ये घालावीत.
  • या काळात झाडं आणि झुडपांना हात लावू नये, असं सांगितलं जातं.
  • चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी सोबत नारळ ठेवावा, यामुळे ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावापासून आई आणि बाळ दोघांचंही संरक्षण होईल आणि नंतर हा नारळ नदीत विसर्जित करा.
  • या काळात गरोदर महिलांनी चुकूनही तीक्ष्ण वस्तूंचा, चाकूचा वापर करू नये.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल रत्नागिरी खबरदार कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

कोजागिरी पौर्णिमा 2023 चंद्रोदयाची वेळ

शरद पौर्णिमा, म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदय संध्याकाळी 05 वाजून 20 मिनिटांनी होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:47 25-10-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here